सध्या राज्यसभेच्या निवडणुकीवरुन राज्यातील राजकारण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. या निवडणुकांच्या निमित्तानं राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. शिवसेनेनं राज्यसभेची सहावी जागा लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता भाजपनेही देखील आपला उमेदवार देण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत.